Ramdas athawale And Prakash Ambedkar Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पवार-ठाकरेंनंतर आंबेडकरी एकत्र? रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकरांच मनोमिलन होणार? पाहा स्पेशल व्हिडिओ

Ramdas Athawale and Prakash Ambedkar : ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेनंतर आता रिपब्लिकन पक्ष ही एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलीय. खुद्द आठवलेंनीच प्रकाश आंबेडकरांना ऑफर देत एकत्रीकरणाचा विडा उचललाय. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

राज्याच्या राजकारणात दुरावलेली मन आणि दुरावलेले पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा रंगत आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्याही चर्चा सुरु आहेत. त्यातच आता भर पडलीय ती केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची...आठवलेंनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनाच खुली ऑफर दिलीय.

याआधीही रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्र येण्याबद्द्ल वक्तव्य झाली होती. आठवलेंनी याआधी आंबेडकरांना कधी कधी ऑफर दिलेली ते पाहूयात...

रिपब्लिकन पक्ष एकत्र येणार?

16 जानेवारी 2024

अकोल्यात आठवलेंकडून आंबेडकरांना रिपब्लिकन ऐक्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

9 नोव्हेंबर 2024

महायुतीच्या सभेतून आठवलेंकडून आंबेडकरांना RPI चा अध्यक्ष होण्याची ऑफर

15 मे 2025

ठाकरें बंधूच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर आठवलेंची आंबेडकरांना पुन्हा ऑफर

आंबेडकर आणि आठवले या दोघांचे राजकीय मार्ग वेगळे असले तरी, दलित आणि आंबेडकरी समाजाच्या एकीकरणासाठी आठवले यांनी सातत्याने आंबेडकरांना एकत्र येण्याचे आवाहन केलेय. मात्र आठवलेंच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांनी थेट प्रतिक्रिया दिलेली नाहीए. आता वंचितच्या प्रदेशाध्यक्षा आठवले- आंबेडकर एकत्रयेण्याबद्दल काय म्हणतात? पाहूयात

आठवलेंच्या ऑफरमुळे राजकीयदृष्ट्या महायुतीला बळकटी देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना एकत्र घेण्याची रणनीती आखली जातेय का? असा प्रश्न निर्माण होतोय. त्याउलट प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या पक्षाला स्वतंत्र ठेवण्यावर भर दिलाय. विधानसभेतही महाविकास आघाडीसोबत त्यांचे सूर जुळले नाहीत. तर आता आठवलेंसोबत जुळतील का? हा खरा प्रश्न आहे.दुसरीकडे विधानसभेत अकोला पॅटर्न फेल गेल्यानं वंचितचं अस्तित्तव टिकवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आठवलेंची साथ देतील का? हे येणारा काळच ठरवेल,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT