Maharashtra Weather Update News  AI Image
महाराष्ट्र

Weather Update : 'अर्णब' चक्रीवादळाचा हाहाकार! महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Today Update News : महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता असून रायगड, रत्नागिरी, नाशिक, नागपूरसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घ्या जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस

  • रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाचा अंदाज

  • नाशिक, धुळे, नंदुरबार तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाची शक्यता

  • अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ अतितीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामानाचा विचार करून संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, कमाल तापमानातही घट होऊ शकते.

कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात, तर विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘अर्णब’ चक्रीवादळाचा प्रभाव

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णब’ अतितीव्र चक्रीवादळ बुधवारी सकाळी आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनाऱ्यावर धडकले. या चक्रीवादळामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आज चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण आणि पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चिंचवड येथील कुणाल मार्केट इमारतीत भीषण आग; 17 दुचाकी, 4 चारचाकी जळून खाक, एक जण जखमी

Headache : थंडीत अर्ध डोकं दुखतं? असू शकतो 'या' गंभीर आजाराचा संकेत!

Thursday Horoscope : कामात तुमची चर्चा होईल! 5 राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

MLC Election: नागपूरमध्ये भाजपचा पराभव; पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट

प्रदीप पूर्णेकर हत्येवरून ठाण्यात तणाव; राजेंद्र शिंदेंच्या अटकेसाठी ठाणे जाम

SCROLL FOR NEXT