Viral Dance Video Saamtv
महाराष्ट्र

Viral Dance Video: 'मला बाई दारूड्या भेटलाय नवरा...' गाण्यावर चिमुकल्याचा जबराट डान्स, हावभाव पाहून नेटकरीही झाले फिदा; पाहा VIDEO

Viral Dance VIdeo On Marathi Song: त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून अनेकांना हसू आवरणं कठिण झालं आहे.

Gangappa Pujari

Viral Dance Video News: सोशल मीडियावर लहान मुलांच्या बाललिलांचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यांच्या या करामतीची सोशल मीडियावर नेहमी चर्चाही होताना दिसत असते. कधी त्यांच्या बोबड्या बोलाचे तर कधी खतरनाक डान्सवर नेटकरी फिदा होत असतात. सध्या अशाच एका चिमुकल्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओमधील त्याच्या कडक एक्सप्रेशन्सने सर्वांनाच भुरळ घातली आहे. (Latest Marathi News)

आपल्याला सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतात. जे कधी आपणाला थक्क करणारे असतात, तर कधी हसून हसून पोट धरायला लावणारे असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लहान मुलांशी संबंधित अनेक व्हिडीओ असतात. कारण या चिमुकल्यांचे निरागस कृत्य आणि हृदयस्पर्शी हावभाव पाहायला अनेकांना आवडतं.

सध्या सोशल मीडियावर अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका अहिराणी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. शिवाय त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून अनेकांना हसू आवरणं कठिण झालं आहे.

अहिराणी गाण्यावर भन्नाट डान्स...

अहिराणी लोकगीत 'मला बाई दारुड्या भेटला नवरा माझं नशीब फुटलं गं...'(mala bai darudyaa bhetlay) हे गाणं सुरु झालं आणि चिमुरड्याने जे काही भन्नाट डान्स केला आहे. या गाण्यावर हाताची आणि डोळ्यांची जी हालचाल केली आहे, ते पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. त्याच्या कडक स्टेप्स आणि एक्सप्रेशन्सनी नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावले आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत ७.५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केले आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या चिमुकल्याचा निरागस डान्स पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील देत आहेत. एका नेटकऱ्याने खूप अप्रतिम डान्स असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने ‘खूप गोड; अप्रतिम डान्स’ अशी कमेंट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT