Amravati News  Saam TV
महाराष्ट्र

अचलपूरातील संचारबंदी कायम तर परतवाडा, देवमाळी, कांडलीतील हटवली

आज चौथ्या दिवशी अचलपूर येथील संचारबंदी कायम ठेवण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

अमर घाटरे

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील (Amravati District) अचलपूर येथे रविवारी रात्री दोन गटांमध्ये झेंडा काढण्याच्या वादावरून दंगल झाली होती त्याच पार्श्वभूमीवर संचारबंदी लावण्यात आली होती. आज चौथ्या दिवशी अचलपूर येथील संचारबंदी कायम ठेवण्यात आली, तर आज परतवाडा, देवमाळी व कांडली या ठिकाणची संचारबंदी दुपारी 12 ते रात्री 9 वाजेपर्यंत शिथील करण्यात आली असून अचलपूर येथील संचारबंदी पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी दिली, तर इतर ठिकाणची संचारबंदी उठवण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

संचार बंदी मध्ये पुन्हा 4 तासाची शिथिलता देण्यात आली आहे. अचलपूर, परतवाडा येथे संचार बंदीमध्ये आज सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. चौथ्या दिवशी ही संचार बंदी सुरूच आहे. आज दिवसभरात 10 तासाची शिथिलता देण्यात आली आहे. अचलपूर SDO संदीप कुमार अपार यांनी आदेश काढला आहे. २ गटात हाणामारी झाल्या नंतर अचलपूर परतवाडा येथे संचारबंदी लावण्यात आली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT