Nandurbar Saam TV
महाराष्ट्र

Nandurbar Accident News: यात्रेसाठी निघालेली भाविकांची ओव्हरलोड गाडी नाल्यात कोसळली; तीन मुलांसह चौघांचा मृत्यू, 50 जण जखमी

काल संध्याकाळी उशीरा हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबारमध्ये गाडी उलटून झालेल्या अपघातात चार जणांना मृत्यू झाला आहे. तर 50 जण या अपघातात जखमी झाले आहेत. नंदुरबारमधील अतिदुर्गम भाग मानल्या जाणाऱ्या भराडीपादर गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. काल संध्याकाळी उशीरा हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, काही जण क्रुझर गाडीने यात्रेनिमित्त खापरला जात होते. मात्र क्रुझर गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. या दरम्यान चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातानंतर ही गाडी उतारावरुन थेट नाल्यात उलटली.

अपघातातील सर्व प्रवासी सातपुडा पर्वत रांगातील कोठली आणि इतर गावचे रहिवासी आहे. प्रवाशांमध्ये लहान मुले आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. मृतांमध्ये चार पैकी तीन मयत हे अल्पवयीन मुले आहेत.जखमींवर अक्कलकुवा आणि नंदुरबार सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT