Sangali News Saamtv
महाराष्ट्र

Crime News: सांगली जिल्हा हादरला! जमिनीच्या वादातून दोघांचा खून; चौघेजण गंभीर जखमी

Sangali Crime: या भीषण हत्याकांडाने सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sangali: जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. जत तालुक्यातील कोसारी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. जागेच्या वादातून दोन गटात तुफान मारामारी झाली, ज्यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Sangali News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, कोसारी (ता.जत) येथे भावकीतील एका कुटुंबास विहीर खाणत असलेली जागा आमची आहे.असा हक्क सांगितल्याने जोरदार तलवारी सह धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी दोन गटामध्ये भीषण मारामारी झाली. या वादात एका गटाने केलेल्या तलवार हल्ल्यात दोघे जागीच दोघजण ठार झाले आहेत. प्रशांत दादासो यमगर (वय २४) आणि विलास नामदेव यमगर (वय.४४) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोसारी येथे घडली आहे.

दरम्यान, या हल्ल्यात दादासो नामदेव यमगर (वय. ४८) प्रवीण विलास यमगर (वय. २०) यशवंत भाऊसो खटके (वय.५२) रा. गुळवंची हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जत येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी हल्लेखोर तानाजी बाबा यमगर, धनाजी बाबा यमगर, शिवाजी बाबा यमगर व अन्य संशयित हल्लेखोर फरार झाले आहे. (Latest Marathi Newd Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT