महाराष्ट्र

Ahmednagar News: जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल चालकाला मारहाण; टोळक्याकडून हॉटेलचीही तोडफोड

साम टिव्ही ब्युरो

अहमदनगर : जेवणाचे बिल मागितल्याच्या वादातून टोळक्याने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये घडली असून हॉटेल चालक आणि कामगारांनाही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने बंदची हाक दिल्याने कर्जत शहरातील व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला. (Ahmednagar News)

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरात शनिवारी रात्री एका हॉटेलमध्ये जेवायला आलेले ग्राहक आणि हॉटेल चालकामध्ये बिलावरून वाद झाले. यावेळी संबधित टोळक्याने हॉटेलचे मालक पंडित निंबाळकर यांच्यासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत हॉटेलची तोडफोड केली. (Latest Marathi News)

तसेच गल्ल्यातील रोकड आणि हॉटेल चालकाच्या गळ्यातील सोन्याची चेन या टोळक्याने चोरून नेली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आज कर्जत शहरांमध्ये उमटले. या घटनेचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने आज कर्जत शहर बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे कर्जत शहरामध्ये सकाळपासून सर्व व्यवहार पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत.

सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा बेमुदत कर्जत शहर बंद ठेवू असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. कर्जत शहरातून सकाळी युवकांनी रॅली काढली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडे शनिवारी घडलेल्या मारहाणीच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट, अनेक ठिकाणी गारपीठ

Iran US Conflict: अमेरिकेविरोधात इराणचं 'आर्थिक अस्त्र', अमेरिकन कंपन्यांवर हल्ला? वाचा संपूर्ण लिस्ट

जैन मुनीच पेटवतायेत मराठी-मारवाडी वाद? ताराराणींबद्दलच्या वक्तव्याचे राज्यातही पडसाद

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

SCROLL FOR NEXT