Chhatrapati Sambhajinagar Crime Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाला जाताना सावधान!; हॉलमध्ये घुसली मुलं चोरणारी टोळी अन्...

Crime News: या टोळक्याने काल देखील एका चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar: प्रत्येकाला आपलं मुल फार प्रिय असतं. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या बाळाची डोळ्यात अगदी तेल घालून काळजी घेतात. अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळक्याने काल देखील एका चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. (Latest Crime News)

लग्नातून चिमुकलीला चोरण्याचा प्रयत्न

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रस्त्यावर एका लॉन्समध्ये रात्री लग्नसमारंभ पार पडत होता. या लग्न समारंभामधून एका छोट्याशा चिमुकलीला घेऊन एक व्यक्ती तिचे अपहरण करत होता. चिमुकलीला घेऊन भिंतीवरून उडी मारत असताना काही सजक नागरिकांनी त्याला पाहिले आणि त्यानंतर त्याला पकडून विचारपूस केली.

चिमुकलीचे अपहरण करत असताना या व्यक्तीला रंगे हात पकडण्यात आले. आपली चोरी पकडली गेल्याचे लक्षात येताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित नागरिकांच्या हे लक्षात येताच नागरिकांनी संताप व्यक्त करत त्याला चांगलाच चोप दिला आहे.

लग्नात (Marriage) कोणतेही बाधा नको यासाठी नागरिकांनी आपली शक्कल लढवली आणि त्या व्यक्तीला बेदम चोप देऊन मंगल कार्यालयातील एका खोलीत डांबून ठेवले आहे. तसेच पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच एका खोलीत बंद करून ठेवलेल्या त्या चोरट्याला ताब्यात घेतले आहे.

लहान मुलांचे अपहरण करणारी मोठी टोळी सक्रिय आहे. सदर व्यक्ती याच टोळीतील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे पोलीस या व्यक्तीची कसून चौकशी करत असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम देखील सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT