Gondia News  saam tv
महाराष्ट्र

Crime News: संतापजनक! अश्लिल चित्रफित दाखवत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; पोलिसांनी केली अटक

तु सुंदर दिसतेस, मला आवडतेस म्हणत लैंगिक छळ विद्यार्थीनीचा लैंगिक छळ करणाऱ्या या शिक्षकाविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अभिजित घोरमारे

Gondia News: गोंदिया जिल्ह्यात शिक्षक आणि विद्यार्थीनीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना दिवसेंदिवस घडत असून अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा अश्लील चित्रफिती दाखवून छळ करणारी घटना गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका विद्यालयात घडली आहे. हेमंतकुमार गुलाराम येरणे (35), रा.इसापूर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीला असून विशेष सत्र न्यायालयाने 28 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका विद्यालयात नवव्या वर्गात शिकत आहे. या शाळेतील शिक्षक हेमंतकुमार येरणे हा पीडिता व तिच्या मैत्रिणींच्या पाठीवरून हात फिरवायचा. कपडे ओढून आपल्या कक्षात बोलवायचा. एकांतात आपल्याकडील मोबाइलमध्ये अश्लील चित्रफिती दाखवत पीडित विद्यार्थिनीला 'तू सुंदर आहेस. तू मला आवडते' असा संवाद साधायचा तसेच तिच्या मैत्रिणींशीही असेच अश्लिल वर्तन करायचा.

या सगळ्या प्रकारावर पीडित मुलींनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत त्याची लैगिंक इच्छा असल्याचे आपल्या बयाणामध्ये सांगितले आहे. ज्यानंतर अर्जुनी मोरगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. या शिक्षकाविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच गोंदिया (Gondiya) तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड तसेच त्यांना अश्लील चित्रफीत दाखवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता अर्जुनी मोरगाव तालुक्यातील घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Koliwada Recipe : रोजच्या वरण भाताला कंटाळलात? मस्त चटपटीत पनीर कोळीवाडा रेसिपी बनवा फक्त १५ मिनिटांत

Maharashtra News Live Update: पिंपरी चिंचवड शहरात आजपासून पाणी पुरवठ्यात 15 टक्के पाणी कपात

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

रक्तातील साखर वाढणार नाही! फक्त या 3 भाज्या खा

पगडीने तोंड दाबलं, हाताची नस कापली, गळा दाबून 7 वर्षांच्या निरागस मुलाची हत्या, भद्रकालीच्या जंगलात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT