Maharashtra Crime News SaamTv
महाराष्ट्र

Crime News: धक्कादायक! भीमा नदीत आढळला पाच तुकडे केलेला आणि शिर नसलेला मृतदेह, परिसरात खळबळ

भीमा नदी पात्रात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळ्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Gangappa Pujari

Mangesh Kachare

Baramati News: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा नदीत सात मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. यानंतर पोलिस तपासात एका मोठ्या हत्याकांडाचा उलघडा झाल्याने संपुर्ण महाराष्ट्र हादरला होता.

ही घटना ताजी असतानाच इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे आज भीमा नदी पात्रात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, भीमा नदीत पाच तुकडे केलेला मृतदेह आढल्याने खळबळ माजली आहे. या ३० वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून करुन त्याचे पाच तुकडे करत शीर विरहित मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत टाकण्यात आला आहे.

ही घटना समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून या गुढ रहस्यमय क्रुर खूनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर, भिगवणचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ambarnath : दुचाकीस्वाराची बस चालकाला दगडाने मारहाण; चालक गंभीर जखमी

Sonu sood: सोनू सूदच्या अडचणी वाढल्या, थेट ईडीने चौकशीसाठी पाठवले समन्स, वाचा नेमकं प्रकरण

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आज बीड दौऱ्यावर

Maharashtra Politics: मराठवाड्यात भाजपसह पवारांना मोठा धक्का, अनेक बड्या नेत्यांसह २० सरपंचांचा ठाकरे सेनेत प्रवेश

IND Vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान हँडशेक वादावर बीसीसीआयने मौन सोडलं; ICC ने पाकला तोंडावर पाडलं

SCROLL FOR NEXT