Chandrapur Kanyaka Bank News Saam Tv
महाराष्ट्र

Kanyaka Bank: चंद्रपूरच्या कन्यका बॅंकेच्या १६ संचालकांवर गुन्हा दाखल

कन्यका नागरी सहकारी बॅंकेच्या ६ संचालकांबरोबरच एकूण १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

चंद्रपूर: विदेशामध्ये राहणाऱ्या व्यक्तीचा नागपूर (Nagpur) येथील भूखंड तोतया व्यक्ती आणि बोगस कागदपत्रे (Documents) तयार करुन गहाण ठेवल्याप्रकरणी चंद्रपूर (Chandrapur) येथील कन्यका नागरी सहकारी बॅंकेच्या ६ संचालकांबरोबरच एकूण १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये बँकेचे (bank) माजी अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल भास्कवार आणि बँक संचालक असलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार (MLA) किशोर जोरगेवार यांचा देखील समावेश आहे. इलेक्ट्रिक अभियंता असलेले मनोहर कऱ्हाळे हे मूळचे नागपूरचे असून, त्यांच्या मालकीचा खामला परिसरात भूखंड होता. (Crime filed against 16 directors Kanyaka Bank Chandrapur)

हे देखील पहा-

१९६५ ला नोकरीनिमित्त ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. मात्र, जून २०२० ला कन्यका नागरी सहकारी बँकेच्या नागपूर येथील सीताबर्डी शाखेने मनोहर कऱ्हाडे यांचा भूखंड लिलावास काढला होता. यानंतर बजाजनगर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस तपासात मुख्य आरोपी असलेल्या स्वप्निल भोंगाडे याने बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि पदाधिकाऱ्यांशी संगनमत करत मनोहर कऱ्हाडे नावाची तोतया व्यक्ती उभी करून तो भूखंड गहाण ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे.

या भूखंडावर १ कोटी २५ लाखांची उचल करण्यात आली. मात्र, कन्यका बँकेने हे सर्व आरोप फेटाळले आहे. त्यांच्या मते सरकारी यंत्रणेने कर्जाबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर कर्जाची रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेने याप्रकरणात कुठलाच गैरव्यवहार केलेला नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT