Crime News, Malkapur, Buldhana saam tv
महाराष्ट्र

Stone Pelting In Malkapur : क्रिकेट सामन्यानंतर तुफान दगडफेक; मलकापूर पाेलिसांत वीस जणांवर गुन्हा दाखल

पाेलिसांचे पथक घटनास्थळी पाेहचल्यानंतर दाेन्ही गटातील लाेक पळून गेले.

संजय जाधव

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील रामदेव बाबा नगर परिसरात क्रिकेट सामन्यानंतर दोन गटात राडा झाला. या वादातून दाेन्ही गटाकडून तुफान दगडफेक झाली. दोन्ही बाजूचा जमाव आक्रमक झाला हाेता. त्यातून तुफान हाणामारी देखील झाली. पाेलिस (police) विभागाने घटनेतील वीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

मलकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी घटनेसंदर्भात दिलेली माहिती अशी रामदेव बाबा नगर परिसरात क्रिकेट (cricket) सामन्यातील जिंकल्यावरून दोन गटात वाद झाला. त्यातून मारामारी झाली.

पाेलिसांचे पथक घटनास्थळी पाेहचल्यानंतर दाेन्ही गटातील लाेक पळून गेले. दोन्ही गटातील वीस जणांवर दंगा केल्याप्रकरणी मलकापूर (malkapur) शहर पोलीसांनी (कलम १६० नुसार) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा कसून तपास सुरु आहे. घटनास्थळी पाेलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असल्याचे रत्नपारखी यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT