Smriti Mandhana Saam Tv
महाराष्ट्र

Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक, विवाहसोहळा रद्द

Smriti Mandhana-Palash Muchhal wedding: स्मृती मानधनाच्या लग्नातून मोठी बातमी समोर आली आहे. तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Priya More

Summary -

  • स्मृती मानधनाच्या लग्नातून मोठी बातमी समोर आली

  • स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका

  • रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात दाखल

  • लग्न रद्द किंवा पुढे ढकलण्याची शक्यता

भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या लग्नसोहळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला असून त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. स्मृतीचे लग्न लागण्यापूर्वीच ही घटना घडली. त्यामुळे तिचा लग्नसोहळा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. लग्नसोहळ्याच्या ठिकाणी ही घटना घडली. समडोळ येथील मानधना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना ही घटना घडल्यामुळे एकच गोंधळ उडाला. लग्नसोहळ्याच्या ठिकाणी रुग्णवाहिका आल्यामुळे नेमकं काय घडलं हे कुणालाच कळाले नाही. पण आता अशी माहिती समोर आली की स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला.

हार्ट अटॅक आलेल्या वडिलांना रुग्णवाहिकेतून तात्काळ सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये स्मृती मानधना आणि कुटुंबीय दाखल झाले आहेत. वडिलांवर उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लग्नसोहळ्याच्या ठिकाणावरून काही नातेवाईक रुग्णालयाच्या दिशेने निघाले आहेत.

स्मृती मानधनाचा आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा आज सांगलीमध्ये पार पडणार आहे. सायंकाळी साडेचार वाजताचा लग्नाचा मुहूर्त आहे. लग्न सोहळ्यासाठी क्रीडा आणि विविध क्षेत्रातल्या दिगज्यांची हजेरी लावली आहे. अशातच स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यामुळे तिचे लग्न रद्द करण्यात आले आहे. लग्नाच्या ठिकाणावरून येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे. लग्न सोहळ्याच्या ठिकाणी डेकोरेशन काढण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, आठवड्याची मंत्रिमंडळ बैठक रद्द

SCROLL FOR NEXT