Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Bachchu Kadu Live News : विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टानं बच्चू कडू यांना एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केली आहे.

Namdeo Kumbhar

Bachchu Kadu News Update : विधानसभेच्या निवडणूक निकालाचा (Vidhan Sabha Election News) आजचा दिवस आहे. महाराष्ट्रावर कोणाची सत्ता असणार? काहीच तासात स्पष्ट होणार आहे. पण त्याआधीच प्रहारचे बच्चू कडू यांच्यासाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मंत्रालय अधिकाऱ्याला धमकी आणि शिवीगाळ प्रकऱणातून त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. विधानसभेचा निकाल लागण्याआधीच बच्चू कडू यांना हा मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जातेय. बच्चू कडू अचलपूर मतदारसंघातून पाचव्यांदा रिंगणात उतरले आहेत. थोड्याच वेळात अचलपूरचा निकाल समोर येणार आहे, त्याआधी बच्चू कडू यांच्यासाठी आनंदाची बातमी आली. (Court acquits MLA Bachchu Kadu in 2011 Mantralaya clerk slapping case)

निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडू यांना कोर्टाचा दिलासा मिळाली आहे. मंत्रालय अधिकार्‍याला धमकी व शिवीगाळ प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधातील खटला मुंबई सत्र न्यायालयाकडून निकाली काढण्यात आला. सनदी अधिकारी प्रदीप बी. मंत्रालयात, महाराष्ट्र मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. 29 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय अॅनेक्स बिल्डींगच्या सातव्या मजल्यावरील कार्यालयात सायंकाळी पाचच्या सुमारास घटना घडली होती. 'महापरिक्षा' वेबपोर्टलमधील काही त्रुटींबाबत जाब विचारण्यासाठी बच्चू कडू व त्यांच्या प्रहार संघटनेचे लोक आले होते.'महापरिक्षा' महाराष्ट्र आयटी कार्पोरेशनकडून घेतली जाते. कॉर्पोरेशनकडून माहिती मिळाली की लगेच देतो, असं उत्तर देताच बच्चू कडू संतापले होते.

संतापलेल्या बच्चू कडू यांनी टेबलावरील आयपॅड उचलून उगारत अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि अपमान करण्यास सुरुवात केली. "सरकारी नोकर आहात, तसेच सांभाळून वाग.तुझी सॅलरी तुझा बाप देत नाही. दोन दिवसांत उत्तर द्या, नाहीतर तुम्हाला बघून घेईन", अशी धमकीही बच्चू कडूंनी दिली. याप्रकरणी 27 सप्टेंबरला मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याआधारे पोलीसांनी एफआयआर दाखल करुन घेत तपास पूर्ण करत बच्चू कडूंविरोधात खटला वर्ग केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT