Nanded Crime  Saam TV
महाराष्ट्र

Crime News: जागेच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला; चाैघांवर गुन्हा दाखल

शहरातील नविन कौठा भागातील म्हाडा काॅलनीत हा राडा झाला.

संतोष जोशी

नांदेड : नांदेड (nanded) शहरात प्लाॅटच्या जागेच्या वादावरून चाैघांनी एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला केल्याने शहरात (city) एकच खळबळ उडाली. या चाैघां विरोधात ग्रामीण पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (nanded latest marathi news)

शहरातील नविन कौठा भागातील म्हाडा काॅलनीत साेमवारी हा राडा झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी : बालाजी राजे यांचे आणि शिवाजी पटने यांचे जागेवरुन वाद होते. साेमवारी शिवाजी पटने याने पत्नी योगिता, मुलगी माया अन्य एक अशा चार जणांनी बालाजी राजेच्या घरी जाऊन लोखंडी राॅड, काठ्याने राजे आणि पत्नी पोर्णिमा यांच्यावर जिवघेणा हल्ला केला.

यामध्ये राजे पती पत्नी गंभीर जखमी (injured) झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बालाजी राजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी पटनेसह चाैघांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT