WhatsApp Saam TV
महाराष्ट्र

Nanded: घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने WhatsApp स्टेटस ठेवत प्रेमीयुगुलाची आत्महत्या

22 वर्षीय मुलांचे गावातील 18 वर्षीय मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं मात्र घरच्यांचा या दोघांच्या लग्नाला विरोध होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आजकाल कोणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असो किंवा महत्वाच्या गोष्टींची माहिती इतरांना कळविण्यासाठी आपण WhatsApp स्टेटस ठेवत असतो. मात्र WhatsApp स्टेटस चा उपयोग आपलं आयुष्य संपविणार असल्याची माहिती देण्यासाठी वापरल्यची घटना नांदेड मध्ये समोर आली आहे.

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वडगावमधील एका प्रेमीयुगुलानं विष पिऊन आत्महत्या केली आहे. मात्र या तरुण प्रेमीयुगुलानी रविवारी रात्री आपल्या WhatsApp Status ला स्वत:च्या श्रद्धांजलीचे फोटो ठेवले आणि त्यांनी विष पिले. हा स्टेटस पाहणाऱ्य़ां त्यांच्या संपर्कातील लोकांनी त्यांना फोन केले मात्र दोघांनीही फोन उचचला नाही त्यामुळे त्यांनी काहितरी बरंवाईट केल्याची शंका आल्याने त्यांचा शोध घतला असता त्या दोघांचे मृतदेह सकाळी सातच्या आढळले आहेत.

हे देखील पहा -

सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तामसा पोलिसांना दिल्य़ानंतर पोलिसांन दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान 22 वर्षीय मुलांचे गावातील 18 वर्षीय मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. त्यामुळे या जोडप्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात मोठे फेरबदल; एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Bank Holiday News: पुढील आठवड्यात सलग 4 दिवस बँका बंद; SBI, HDFC सह सर्व बँकांच्या ग्राहकांनी आधीच तपासा सुट्ट्यांची यादी

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; गुंजाळवाडी, वडगाव सहाणी आणि सावरगाव परिसराला दिलासा

रोज सकाळी प्या मनुक्याचं पाणी, हे 5 आजार दूर होतील

विकृतीचा कळस! ६० वर्षीय नराधमांचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; कल्याण हादरलं

SCROLL FOR NEXT