cotton corporation of india and nafed should purchase cotton from farmers demands swabhimani shetkari sanghatana saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana : कापसाची खरेदी सी.सी.आय, नाफेडने करावी : 'स्वाभिमानी'ची मागणी

शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला आहे. पण भावात घसरण होत असल्याने आणखी किती दिवस कापूस सांभाळायचा असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.

राजेश काटकर

Parbhani News :

कापसाच्या दरात चढ उतार हाेत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतक-यांच्या हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरसावली आहे. कापसाची संपूर्ण खरेदी भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच सी.सी.आय (Cotton Corporation of India) व नाफेड (nafed) मार्फत करावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (swabhimani shetkari sanghatana) आज (शुक्रवार) परभणी (parbhani) येथे केली आहे. (Maharashtra News)

शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला होता. पण भावात घसरण होत असल्याने आणखी किती दिवस कापूस सांभाळावा असा प्रश्न परभणी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी विचारु लागले आहेत. कापसाचे भाव घसरु लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

एकीकडे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा कपाशीला रेंटचच्या नावाखाली दीड ते दोन हजार रुपयांचा दर कमी दिला जातो तर दुसरीकडे व्यापा-यांचा भरमसाठ पाणी टाकलेला कापूस बाजार समितीला कसा चालतो असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विचारला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यापुढे जिल्ह्यातील सर्व गोरगरीब कष्टकरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस हा सीसीआय मार्फतच खरेदी करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT