Anil Gholap saam Tv
महाराष्ट्र

Video: पूर्वी करायचे राडा, आता बैठकीमुळे बदलले जीवन; झाले नगरसेवक, इतका बदल कसा झाला?

anil Gholap : शांत, सर्वांना सहकार्य करणारी व्यक्ती, प्रेमाने-आपुलकीने सर्वांशी बोलणारा माणूस म्हणून अनिल घोलप यांची ओळख आहे.

साम टिव्ही ब्युरो

Appasaheb dharmadhikari News: रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये अनिल घोलप हे मोठे प्रस्थ आहेत. शांत, सर्वांना सहकार्य करणारी व्यक्ती, प्रेमाने-आपुलकीने सर्वांशी बोलणारा माणूस म्हणून अनिल घोलप यांची ओळख आहे. पण ती पूर्वी तशी नव्हती. 90 च्या दशकापूर्वी अनिल घोलप हे दारू पिऊन मारामारी, भांडणं, भाईगिरी करणारा वाया गेलेला माणूस होता.

सद्गुरू नानासाहेबांचा परीस स्पर्श झाला आणि वाल्याचा वाल्मिकी होण्याची कथा सत्यात उतरली. 1990 मध्ये अनिल यांनी पत्नी आणि दोन मुलांसह बैठकीला जाण्यास प्रारंभ केला. निरुपण, श्रवणाने मिळणाऱ्या ज्ञानाने जीवनात प्रकाश पडला आणि त्यांची दारूपिण्याची सवय सुटली. दारू पाठोपाठ मारामाऱ्या, भाईगिरी देखील बंद झाली. घोलप यांनी पारंपारिक खाटीक व्यवसायावर जम बसवला.

दारु, मारामाऱ्या, भांडण बंद झाल्याने घरातील वातावरण भक्ती मार्गात बदलले. घोलप यांना शिवसेनेकडून महाड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जाण्याची संधी मिळाली. अनिल यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित असून कारखान्यांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी भाईगिरी करणारे अनिल घोलप हे आज शांत संयमी माणूस म्हणून सर्वांना परिचित आहेत.

अनिल यांचा स्वभाव प्रचंड तापट असल्याने वडील घरात येणार म्हटलं की भीती वाटायची अशी प्रतिक्रिया घोलप यांचा मुलगा अभिषेक याने दिली. बैठकीला जाण्यास प्रारंभ केल्यानंतर परिस्थिती बदलली. आज घरात जो बदल आहे, समाजात जी प्रतिष्ठा आहे याचे सर्वश्रेय अभिषेक बैठकीला देतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Winner : मराठीनंतर तन्वी कोलते हिंदी बिग बॉस गाजवणार? स्वतः केला मोठा खुलासा

बोअरवेलफेम 50 तास मृत्यूशी झुंज देणारा प्रिन्स झाला 25 वर्षांचा

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील ६ आरोपींचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल

Maharashtra Weather: राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस अन् गारपिटीचा इशारा; आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Yoga Poses For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी आता जिमची गरज नाही, घरीच करा हे 5 सोपे योगा

SCROLL FOR NEXT