corona update  
महाराष्ट्र

रुग्णसंख्येसह मृत्यूदर घटला; तिस-या लाटेसाठी प्रशासन सज्ज

जयेश गावंडे

अकोला : अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या coronavirus दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत चालला आहे. आता अकोला जिल्ह्याची पॉझिटिव्हीटीचा टक्का फक्त एका टक्क्यांवर आला आहे. यामुळे अकोलेकरांना akola दिलासा मिळाला आहे. दरम्यान दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती नागरिकांच्या मनात कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घट झाली आहे. याबराेबरच दुसरीकडे मृत्युदर देखील घटला आहे. नागरिकांनी काेविड १९ च्या covid19 मार्गदर्शक तत्वांच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (coronavirus-patients-decreased-akola-postitvity-rate-one-percent-sml80)

जुलै महिन्यात आरटीपीसीआरच्या दहा हजार चाचण्या केल्या होत्या. त्यामध्ये केवळ 106 नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळले. अकोल्यात पॉझिटिव्हीटी जरी कमी असली तरी इतर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने अकोला जिल्ह्यात संभावित तिसरी लाट येऊ शकते या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.

जिल्ह्यातील बेड मॅनेजमेंट, ऑक्सिजन मॅनेजमेंट, आणि स्टाफ मॅनेजमेंट या दृष्टिकोनातून सविस्तर असा एक्शन प्लॅन जिल्हा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेला आहे. वाढीव बेडच्या दृष्टीकोनातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कृषिविद्यापीठाचे जंम्बो हॉस्पिटल (सेंटर) आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांत प्रत्येकी 20 बेडचे नियोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांना काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांचा विसर पडल्याचे जाणवते. नागरिकांनी मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे , वारंवार हात न धुणे याबाबींना विसरुन चालणार नाही असे प्रशासनाने नमूद केले आहे. काही दिवस तरी काेविड १९ चे सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जोपर्यंत तिसऱ्या लाटेची संभावितता जात नाही तोपर्यंत लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे मत तिसऱ्या लाटेच्या नियोजनासंदर्भात बोलतांना निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले.

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 57 हजार 767 रुग्ण आढळून आले.तर यापैकी 56588 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर केवळ 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकीकडे कोरोनाचा धोका जरी कमी होत असला तरी अकोलेकरानो तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने आता बेफिकरी नको.

सद्यस्थिती corona update (2-8-2019 ची रात्री पर्यंतची आकडेवारी)

एकूण पॉझिटीव्ह रुग्ण : 57767

एकूण मृत्यू : 1134

डिस्चार्ज : 56588

दाखल रुग्ण 45

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT