Corona news  Saam Tv
महाराष्ट्र

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाची पुन्हा 'एंट्री'; 24 तासांत आढळले 5 रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाने आपला कहर सुरू केल्याचे दिसत आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून देशभरासह महाराष्ट्रात कोरोना (Corona) रुग्णसंख्या वाढण्यास सुरूवात झाली आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. जानेवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातून कोरोना जवळपास हद्दपार झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाने आपला कहर सुरू केल्याचे दिसत आहे. (Gondiya Latest Corona News)

गोंदिया जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात कोरोनाचे 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 8 इतकी झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. 1 मे रोजी तर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला.

मात्र, आता पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण देशातील काही भागांतच आढळून येत होते. मात्र आता जवळपास संपूर्ण राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. कोरोनामुक्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाने एन्ट्री मारल्यामुळे नागरिकांननी काळजी घेणे गरजेचे आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ring Side Effects : नेहमी अंगठी घालता? तर वेळीच व्हा सावधान! छोट्याशा रिंगमुळे होतील 'या' ७ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाचे आगमन

Sugar Price: गणेशभक्तांना मोठा दिलासा! साखरेच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT