बीडच्या गोळेगावात उसाच्या फडात जाऊन मजुरांचं कोरोना लसीकरण Saam TV
महाराष्ट्र

बीडच्या गोळेगावात उसाच्या फडात जाऊन मजुरांचं कोरोना लसीकरण

दरम्यान राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मागीत काही काळात कोरोना रुग्ण कमी होत आहेत.

विनोद जिरे

बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील गोळेगाव परिसरात, ऊसाच्या फडात काम करणाऱ्या मजुरांचे, फडात जाऊन कोविड लसीकरण सुरू केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी अधिक होत असल्याने, डॉ. वसंत पवार यांनी प्रत्येक गावात जाऊन लसिकरण मोहीम सुरु केली आहे. गेवराई तालुक्यातील गोळेगांव येथील शेतात जाऊन, डॉ. वसंत पवार, डॉ. वृषालीताई , डॉ. गुळे मॅडम, अनिल काळे यांच्यासह आशा कार्यकर्त्यां अन् अंगणवाडीताई यांनी या लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे.

दरम्यान राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. मागीत काही काळात कोरोना रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे राज्यात सर्व आस्थापना सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाला हरवायचं असेल तर कोरोना लसीकरण होणं गरजेचं आहे. त्यामुळे राज्यात आणि देशात कोरोना लसीकरण वेगात सुरु आहे. शहरी भागात लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत परंतु राज्यातील ग्रामीण भागात लसीकरण पाहिजे तेवढं होत नाही. त्यामुळे प्रशासन वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहे. काही जिल्ह्यात कोरोना लस घेतली नाही तर राशन मिळणार नाही तसेच नो व्हॅक्सीन नो एन्ट्री असे नियम लावले जात आहेत. त्यामुळे लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT