Corona saam tv
महाराष्ट्र

Corona : अकोल्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यु; रुग्णसंख्याही वाढतेय!

अकोल्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर आज दिवसभरात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर आज दिवसभरात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या दोन मृतांपैकी एक जण हा मूर्तिजापूर (Murtijapur) येथील 84 वर्षीय पुरुष रुग्ण असून दुसरा हा अकोल्यातील (Akola) जुने शहर परिसरातील 55 वर्षीय पुरुष रुग्ण आहे. तर , आज 254 नव्या रुग्णांची भर पडल्याने अकोलेकरांची चिंता वाढलीय.

हे देखील पहा :

दरम्यान, आज 90 जणांना होम आयसोलेशन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या 24 तासांत अकोल्यात 490 नव्या रुग्णाची वाढ झालीय. कोरोनाची (Corona) दुसरी लाट ओसरल्यानंतर अकोल्यातील नागरिक बेफिकीर झाले होते. अनेकांनी मास्क घालनेही बंद केले होते. लसीकरणही (Vaccination) मंदावले होते. मात्र प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने पुन्हा एकदा कोरोनाचे नवीन रुग्ण (Corona Patients) समोर येत आहेत. कोरोना संसर्ग तपासणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आज दिवसभरात 256 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

दाखल रुग्णांची संख्या पंधराशे पार -

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 59796 इतकी आहे. त्यात 1145 मृत झाले आहेत. तर 57119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1532 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या :

4 जानेवारी - 28 रूग्ण

5 जानेवारी - 32 रुग्ण

6 जानेवारी - 32 रुग्ण

7 जानेवारी - 58 रुग्ण

8 जानेवारी - 90 रुग्ण

9 जानेवारी - 92 रुग्ण

10 जानेवारी - 57 रुग्ण

11 जानेवारी - 199 रुग्ण

12 जानेवारी - 196 रुग्ण

13 जानेवारी - 284 रुग्ण

14 जानेवारी - 260 रुग्ण

15 जानेवारी - 246 रुग्ण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Bite: साप चावल्यावर लगेच काय करावे?

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

SCROLL FOR NEXT