आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक..
आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक..  Saam Tv
महाराष्ट्र

आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना कोरोना चाचणी बंधनकारक..

भरत नागणे

भरत नागणे

पंढरपूर : दहा मानाच्या पालख्या सोबत येणाऱ्या ४०० वारकर्यांना पंढरपुरात प्रवेश करण्यापूर्वी कोरोनाची Corona आरटीपीसीआर RT PCR चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. Corona test is mandatory for devotees participating in Ashadhiwari

दरम्यान पंढरपूर Pandharpur ते वाखरी Vakhari असा सहा किलोमीटर अंतर पायी वारीत सहभागी होण्याची परवानगी ही देण्यात आली आहे. आषाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने State Government नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये हे नवीन नियम लागू केले आहेत.

हे देखील पहा-

वाखरी ते पंढरपूर पायी वारी करण्यास परवानगी :

यापूर्वी वाखरी पासून पुढे फक्त दीड किलोमीटर अंतर आषाढी पायी वारीत सहभागी होण्याची परवानगी दिली होती. त्यामध्ये आता बदल करून दहा पालख्यातील सुमारे 400 वारकर्यांना सोशल डिस्टन्सींगचे Social Distancing पालन करत इसबावी येथील विसावा मंदिरा पर्यंत वारीत पायी सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.

तेथून पुढे दहा मानाच्या पालख्यातील एकत्रित 20 वारकर्यांना पंढरपूर पर्यंत वारीत सहभागी होता येणार आहे. उर्वरीत 380 वारकर्यांना इसबावीहून विशेष वाहनातून त्यांच्या पंढरपुरातील मठांमध्ये सोडले जाणार आहे.

शासनाची नवीन नियमावली जाहीर:

दरम्यान संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान सोहळ्या नंतर 100 भाविका व्यतरिक्त 250 तर आळंदी येथे 350 वारकर्यांना दर्शनाची परवानगी दिली आहे.

याबाबत आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन महसूल विभागाचे कक्ष अधिकारी हितेंद्र दुफरे यांनी काल हा नवा आदेश पारित केला आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT