नंदुरबारमध्ये कोरोनाचा कहर: आणखीन सापडले दोन ओमायक्रोन पॉझिटिव्ह Saam Tv
महाराष्ट्र

नंदुरबारमध्ये कोरोनाचा कहर: आणखीन सापडले दोन ओमायक्रोन पॉझिटिव्ह

नंदुरबार जिल्ह्यात गेले काही दिवस सतत कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यात गेले काही दिवस सतत कोरोना (Corona) रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. शहरातीलच व्यक्ती पॉझिटिव्ह (positive) आल्याने आता त्या भागातील प्रशासन (Administration) आता अधिक सतर्क झाले आहे. जिल्हा (District) प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार काल संध्याकाळपर्यंत आलेल्या अहवालात एकूण ४४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर दोघांचा ओमायक्रोन (Omicron) अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी यावेळी दिली आहे.

हे देखील पहा-

जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात एका व्यक्तीने १७ डिसेंबर रोजी स्वॅब (Swab) दिला होता, तर दुसऱ्या व्यक्तीचा दिनांक २९ डिसेंबर रोजी घेण्यात आला होता. त्यांचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानुसार या दोन्ही व्यक्तींचा अहवाल ओमायक्रॉन पाॅझिटीव्ह प्राप्त झाला आहे.

यामध्ये एक नंदुरबार (Nandurbar) तर एक शहादा येथील रहिवासी आहेत. हे दोन्ही रुग्ण नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात (hospital) उपचार घेत आहेत. दोन्ही रुग्णांना उपचारांती डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या दोघांनीही लसीकरणाचे (vaccination) दोन्ही डोस पूर्ण घेतलेले आहेत. दोन्ही व्यक्ती परदेशातून आले असल्याने त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT