Beed Swine flu Cases Saam TV
महाराष्ट्र

Beed: कोरोना पाठोपाठ 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव; २४ तासात ७ रुग्णांची नोंद

गेल्या २४ तासांमध्ये ७ 'स्वाईन फ्लू'चे रुग्ण आढळले असून आता एकूण ९ रुग्णासंख्या झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये (Beed) कोरोना पाठोपाठ आता 'स्वाईन फ्लू'चा पुन्हा एकदा शिरकाव झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ७ 'स्वाईन फ्लू'चे (Swine flu) रुग्ण आढळले असून आता एकूण ९ रुग्णासंख्या झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे . आठवडाभरात कोरोनाच्या नव्या ५९ रुग्णांची भर पडली आहे.

कोरोनाची (Corona) भीती कमी झाली असली तरी वाढती रुग्णसंख्या डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने बैठक घेऊन सर्वांनाच लसीकरणाचा टक्का वाढविण्याबाबत सूचना केल्या होत्या. लसीकरण सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी 'स्वाईन फ्लू'चे दोन रुग्ण आढळले. त्यानंतर पुन्हा १०९ लोकांचे स्वॅब घेतले असता त्यात एकाचवेळी तब्बल ७ लोक बाधित आढळले आहेत.

पाहा व्हिडीओ -

यामुळे आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब घेणे सुरू आहेत. दरम्यान, या सर्व रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत. त्यामुळे या सर्वांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र कोरोना व 'स्वाईन फ्लू'चे वाढते रुग्ण पाहून, आरोग्य विभाग (Department of Health) सतर्क झाला असून, उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

भारतीय औषधांवर 100% टॅरिफ; ट्रम्प यांनी खुपसला भारताच्या पाठीत खंजीर

सरकारी कर्मचारी होणार मालामाल; पगारात भरघोस वाढ कधीपासून होणार?

ट्रम्पचा फुगा अमेरिकेनंच फोडला; इराण बलशाली अमेरिकी अधिकाऱ्यांचीच कबुली

Shocking: धावती ट्रेन पकडताना हात सुटला, ५ सेकंद प्लॅटफॉर्म अन् ट्रेनच्या मधोमध फरफटत गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT