दिलासादायक! राज्यातील कोरोना मृत्यूचा आकडा 94 वर Saam Tv
महाराष्ट्र

दिलासादायक! राज्यातील कोरोना मृत्यूंचा आकडा 94 वर

मागच्या 24 तासात राज्यात 6,270 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर, 13,758 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कोरोना रुग्णांची संख्या 10 हजाराच्या आत आली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते. परंतु, आता तो आकडा खूपच कमी झालेला दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये लागू असलेला लॉकडाऊनमुळे (Lockdown) कोरोनाची आकडेवारी कमी करण्यास मदत झाली आहे. राज्यात सध्या 5 टप्प्यात अनलॉक सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात बऱ्याच ठिकाणी 100 टक्के अनलॉक (Unlock) झालेला आहे.

मागच्या 24 तासात राज्यात 6,270 रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर, 13,758 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 59,79,051 रुग्ण आढळले असून 57,33,215 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 94 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात 1,18,313 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 1,24,398 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,96,69,693 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

दरम्यान, राज्यात सध्या कोरोना रुग्णांची टक्केवारी कमी होत आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही कमी होत आहे. मृत्यूदरही कमी झाला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्यात उपाय योजना सुरु केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT