Nashik JN.1 Covid Cases  Saam TV
महाराष्ट्र

JN.1 Covid Cases: ठाणे, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही जेएन.१ व्हेरिएंटचा शिरकाव? संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

JN.1 Covid Cases in Maharashtra: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका महिलेला त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेला जेएन.१ व्हेरिएंटची प्राथामिक लक्षणे असल्याचा संशय डॉक्टरांना आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik JN.1 Covid Cases

कोरोनाच्या नव्या जेएन.१ व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. राज्यातील काही शहरांमध्ये या या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, नाशिकमध्येही या नव्या व्हेरिएंटचा संशयित रुग्ण आढळल्याची माहिती आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका महिलेला त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेला जेएन.१ व्हेरिएंटची प्राथामिक लक्षणे असल्याचा संशय डॉक्टरांना आहे. सध्या संशयित महिलेला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

खबरदारीचा उपाय म्हणून महिला रुग्णाच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर JN 1 विषाणू बाबत स्पष्टता येणार आहे. तर संशयित महिला रुग्णाच्या संपर्कात आलेल्या भावाचे देखील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

दरम्यान, जेएन.१ विषाणूचा संशयित रुग्ण आढळताच शहरात मोठी खळबळ उडाली आहे. काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला असं म्हणता-म्हणता भारतासह अनेक देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. देशात कोरोनाच्या नवीन जेएन.१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. त्यानंतर हा व्हेरिएंट महाराष्ट्रातील कोकणात दाखल झाला. आता कोकणानंतर ठाणे आणि पुणे शहरात कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचे रुग्ण मिळाले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT