Sanjay Raut Saam Tv News
महाराष्ट्र

Sanjay Raut on Suresh Dhas: 'सुरेश धस कधीही पलटी मारतील', धस-मुंडेंच्या भेटीवरून राऊत कडाडले

Suresh Dhas Dhananjay Munde meeting: सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला २ महिने उलटले. या प्रकरणावरून वाल्मिक कराड आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय देशमुख यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, १४ फेब्रुवारीला सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वादळ निर्माण झालं आहे.

एकीकडे टीका दुसरीकडे भेट, यामुळे धस यांच्यावर चहुबाजूने टीका केली जात आहेत. मुंडेंच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांची विचारपूस करायला गेलो असल्याचं धस यांनी सांगितलं. दरम्यान, दोघांमध्ये समेट झालं आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धस यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. धस कधीही पलटी मारतील, असं संजय राऊत म्हणाले.

धस कधीही पलटी मारतील

संजय राऊत यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली आहे. 'मला बीडमधील एका प्रमुख नेत्यानं आधीच सांगितलं होतं. सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवू नका. संतोष देशमुख कुटुंबासाठी लढतील आणि त्यांना न्याय देतील, असं मला वाटलं होतं.

पण काही लोकांनी मला समजावलं. त्यांची बाजू घेऊ नका असं सांगितलं. धस कधीही पलटी मारतील. सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे तिघंही एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची असून, दुर्देवानं हे सत्य होत असल्याचं दिसत आहे', असं संजय राऊत म्हणाले.

अश्रूंचा बाजार मांडला

'मला खूप वाईट वाटतंय, एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार मांडणे अत्यंत चुकीचे आहे. लहान मुलांना आशा होती, हा माणूस आपल्याला न्याय देईल. जर धस यांनी हे कृत्य केलंच असेल तर, देव त्यांना क्षमा करणार नाही. खोटारडेपणा करत जर त्यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर, त्यांना बीडच काय राज्याची जनता लक्षात ठेवेल', अशा शब्दात राऊत यांनी रोष व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT