Devendra Fadnavis, amruta fadnavis  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अहो देवेंद्र भाऊ जरा बायकोला समजवा, नाहीतर.., काँग्रेसच्या महिला नेत्याचा इशारा

'अहो देवेंद्र भाऊ जरा बायकोला समजवा, आमचे राष्ट्रपिता एकच आहेत. आमचा एकच बाप आहे, दोन बाप नसतात हे आमचे संस्कार नाहीत',

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : 'अहो देवेंद्र भाऊ जरा बायकोला समजवा, आमचे राष्ट्रपिता एकच आहेत. आमचा एकच बाप आहे, दोन बाप नसतात हे आमचे संस्कार नाहीत', असं म्हणत काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा संगिता तिवारी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. इतकंच नाही तर, अमृता फडणवीसांना जर प्रसिद्धी हवी असेल, तर त्यांनी विवेक ओबेरॉय यांच्यासोबत अल्बम काढावा असा, घणाघातही संगीता तिवारी यांनी केला आहे. (Maharashtra Political News)

अमृता फडणवीस यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात 'महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि मोदीजी नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं माझं ठाम मत आहे. असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी सुद्धा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)  यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

काय म्हणाल्या संगीता तिवारी?

'अमृता वहिनी तुम्ही आज जे वक्तव्य केलं आहे, जुना बाप नवीन बाप, काय आहे हे..? अमृता वहिनी तुमच्यावरचे संस्कार आम्हाला माहिती नाही. बाप एकच असतो. दोन बाप नसतात, आमच्यावर ते संस्कारही नाहीये. तुमच्यावरच्या संस्काराची चाचपणी करा', असा घणाघात संगीता तिवारी यांनी अमृता फडणवीसांवर केला आहे.  (Latest Marathi News)

पुढे बोलताना तिवारी म्हणाल्या, 'महात्मा गांधी आमच्या पित्यासमान आहे. राष्ट्रपिता एकच असतो. त्यामुळे राष्ट्रपित्याच्या बाबतीत जुना नवा करू नका, प्रत्येक वेळी तुम्ही प्रसिद्धीसाठी काहीही बोलता. जर तुम्हाला एवढीच प्रसिद्धी हवी असेल तर विवेक ओबेरॉय बरोबर एक अल्बम करा', अशी टीकाही संगीता तिवारी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केली आहे.

'अहो देवेंद्र भाऊ जरा बायकोला समजवा, ताईंना समजवा. नाहीतर फार कठीण होईल, जर अमृता फडणवीस यांनी आपले शब्द पाठीमागे घेतले नाही तर आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरू', असा इशाराही संगीता तिवारी यांनी दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालच्या मुर्शिराबादमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

Ashok Saraf: अशोकमामा आणि संकर्षण कऱ्हाडे येणार एकत्र; अभिनेत्याने फोटो शेअर करत म्हणाला, 'आम्हाला दोघांना एकत्रं...'

नांदेडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, ४ जण जागीच ठार

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

SCROLL FOR NEXT