Congress-Vanchit Alliance Mumbai strategy Saam Tv
महाराष्ट्र

भाजपविरोधात काँग्रेस-वंचितची नवी रणनीती, काँग्रेस करणार ठाकरेंना मदत?

Congress-Vanchit Alliance Opens Door for Thackeray Support: मुंबईत वंचित बहुजन आघाडीसोबत युती केलेली काँग्रेस आता ठाकरेंना मदत करण्याची शक्यता आहे.. मात्र काँग्रेसची ही ठाकरेंना मदत करण्याची रणनीती नेमकी काय आहे... आणि कोणत्या भागात काँग्रेस ठाकरेंना मदत करण्याची शक्यता आहे...

Omkar Sonawane

वंचित आणि काँग्रेस आघाडीतील दररोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत..... त्यातच आता ज्या 16 जागांवर वंचितने उमेदवार दिले नाहीत.... त्या जागांवर काँग्रेस थेट ठाकरेंना मदत करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. काँग्रेसची रणनीती नेमकी काय असणार आहे..

काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार नसलेल्या जागांवर अपक्षांना पाठींबा

काँग्रेस विचाराचा अपक्ष नसल्यास ठाकरेंना पाठींबा देण्याची चर्चा

भाजपविरोधी मतांचं विभाजन टाळण्यासाठी रणनीती

दलित, मुस्लीम मतांच्या माध्यमातून ठाकरेंना सहकार्य

खरंतर काँग्रेसनं वंचितला 62 जागा दिल्या होत्या.. मात्र वंचितनं ऐनवेळी 62 पैकी 21 जागा काँग्रेसला परत केल्या आहेत... त्यामुळे 21 पैकी काँग्रेसनं 5 जागांवर उमेदवार दिले... मात्र उर्वरित 16 जागांवर काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार नसल्यानं भाजप आणि शिंदेसेनेचा मार्ग मोकळा झाला... मात्र आता याच जागांवर भाजपचा विजय होऊ नये यासाठी काँग्रेसनं थेट ठाकरेसेनेला मदत करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत... तर या निर्णयावर काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे....

मुंबईत दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, वांद्रे, दादर, सायन, कुर्ला, मानखुर्द या भागात काँग्रेसची पारंपरिक मतं आहेत..

मात्र त्यानंतरही या जागा काँग्रेसनं आघाडीत वंचितला सोडल्या.. मात्र या जागांवर वंचितनेही उमेदवार दिलेच नाहीत... आता या जागांवर भाजपचा विजय होऊ नये, आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी ठाकरेसेनेला मदत केली जाण्याची शक्यता आहे... मात्र काँग्रेसने 16 जागांवर ठाकरेंना बुस्टर मिळाल्यास मुंबई महापालिकेच्या सत्तेचं समीकरण साधण्याचा मार्ग ठाकरेंसाठी मोकळा होईल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

SCROLL FOR NEXT