Nana Patole Slams BJP On Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Nana Patole Reaction:...मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nana Patole reaction on CM Eknath Shinde Visit Ayodhya Tour: 'राम दैवत असून मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे, असल्याचे नाना पटोले यांनी जाहीर केले.

संजय डाफ

Nana Patole News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्येला जाणार असून प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणार आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'राम दैवत असून मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे, असे नाना पटोले यांनी जाहीर केले. (Latest Marathi News)

नाना पटोले म्हणाले, राम आपले दैवत आहेत. मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे. आम्ही देखील रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली. अयोध्येला जाण्यात काही गैर नाही'. हिंदुत्ववादी राजकारणावर भाष्य करताना म्हणाले, 'आम्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य आहे. सर्वसमावेशक हिंदुत्व आम्हाला मान्य आहे'.

मुख्यमंत्र्याच्या पाहुणचारावर भाष्य करताना पटोले म्हणाले, राज्यातील सरकार बिनडोक्याने काम करीत आहे. सरकार स्वतःसाठी जगत आहे. शेतकाऱ्यांना द्यायला पैसे नसताना 1 हजार कोटींची जाहिराती दिल्या आहेत. जनतेचे काही देने घेणे नाही. गॅसच्या किमती कमी केल्या नाही,स्वतःसाठी जगणारी भाजपची सरकार आहे. स्वतःसाठी जगणारं भाजपचं (BJP) सरकार आहे'.

काँग्रेसच्या सभेवर भाष्य करताना पटोले म्हणाले, काँग्रेसच्या सभांची सुरवात नागपुरातून होणार आहे. 6 सभा होणार आहे. राहुल गांधी, प्रियांका आणि खरगे हे या सभा घेणार आहेत. याबाबत 10 तारखेला ठाण्यात मिटिंग घेण्यात येणार आहे'.

' पहिली सभा या महिन्याच्या शेवटला होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची सभा नसून काँग्रेसची सभा राहणार आहे.नागपूरच्या महाविकास आघाडीची सभा ज्या जागेवर होत आहे, त्या जागेबाबत आम्ही विचार करतोय, आज बैठक आहे', असेही पटोले म्हणाले.

पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य करताना पटोले म्हणाले, 'अजून कुठल्याही पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. भाजप पुण्यात निवडणूक लावेल की नाही याबाबत शंका आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऐन वैशाख वणव्यात पंढरपूरचे तापमान 32 अंशावर; वृक्ष लागवडीमुळे नैसर्गिक चमत्कार

Mothers Day 2026: यावर्षी 'मदर्स डे' कधी आहे? तारीख माहितीये का?

Pune : आईला शिवी घातली म्हणून संतापला, मित्रानेच केली मित्राची हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Thalapathy Vijay: थलपती विजयला दहावीला किती गुण होते? मार्कशीट झाली व्हायरल, कोणत्या विषयात किती मिळालेत गुण?

Post Office Best Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, 2 लाखांच्या गुंतवणूकीवर मिळणार ₹90,000; समजून घ्या गणित

SCROLL FOR NEXT