nana patole  SaamTv
महाराष्ट्र

भाजपची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोलचे भाव दुप्पट करण्यासाठी आहे का?

भाजपची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करायला आहे का.? असा खरमरीत सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : भाजपची जनआशीर्वाद यात्रा पेट्रोल, डिझेलचे भाववाढ दुप्पट करायला आहे का.? असा खरमरीत सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भाजपने लोकांना फसवलं आता कशाच्या बळावर तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढलाय असंही त्यांनी म्हटलंय.

हे देखील पहा -

आज पटोले यांचा जालन्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. लोकांना खोटं बोलून भाजपने सत्ता मिळवली आणि महागाई वाढवली आहे. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी ही काँग्रेसची जुनी मागणी असून मी विधानसभा अध्यक्ष असताना अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधानसभेत पारीत केला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ओबीसी आरक्षण जाण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. यावर बोलताना, फडणवीस सरकारने ओबीसींना फसवण्याचं काम केलं असा पलटवार नाना पटोले यांनी केला. अमर,अकबर अँथनीचं हे सरकार आपापसातील भांडणातून पडेल असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय यावर बोलताना अमर,अकबर अँथनी या तिघांनी लोकांना न्याय दिला म्हणून तो सिनेमा हिट झाला. आम्हीही लोकांना न्याय देण्याचं काम करत असून केंद्र सरकारच पाण्यात डूबणार असल्याचं पटोले म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT