NCB Aryan Khan SaamTV
महाराष्ट्र

शाहरुखच्या मुलाला अडकवण्यासाठी NCB ची कारवाई; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

केंद्रातील भाजप सरकार हे ब्लॅकमेलिंग सरकार आहे.

विनोद जिरे

बीड : केंद्रातील भाजप सरकार BJP Goverment हे ब्लॅकमेलिंग सरकार आहे. बीजेपी सरकार अधिकाऱ्यांना तोडपाणी करायला सांगत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केला आहे. ते बीडच्या अंबाजोगाई येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात आले असता माध्यमांशी बोलत होते. (Congress state president accuses BJP)

हे देखील पहा -

पटोले म्हणाले 'लोकशाहीमध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीने सरकार आलेलं आहे. विरोधात असणाऱ्यांना केंद्रीय तपास यंत्रणाचा (Central Investigation Agency) वापर करून भितेचे वातावरण निर्माण केलं जात आहे. भाजप सरकारच्या काळात दोन वर्षे छगन भुजबळ कारागृहात होते. आता त्यांची निर्दोष मुक्तता झाली, केंद्रीय तपास यंत्रणा दुरुपयोग करतात, याचं हे उदाहरण आहे'

तसेच NCB च्या कारवाईमध्ये बीजेपीचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याने अद्याप पर्यंत कुठलेही व्हिडिओ समोर दिले नाहीत, त्यांनी शाहरुख खानच्या Shahrukh Khan मुलाला अडकवण्यासाठी केलेले हे प्रकरण होतं का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या माध्यमातून हिंदू-मुस्लीम (Hindu-Muslim) तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावर राजकीय पोळी भाजन्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे.

मुंब्रा पोर्ट (Mumbra Port) 21 हजार कोटीचे जे ड्रग्ज मिळालं त्यात पोर्ट कुणाच्या ताब्यात होती ? त्याचा मालक कोण होता ? देशात आतापर्यंत किती आले याची चौकशी व्हावी. देशातील तरुणांना ड्रग्ज DRugs मध्ये डुबवन्याचे पाप बीजेपीचे सरकार करत आहे. असा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

SCROLL FOR NEXT