Rohit Pawar - Praniti Shinde Saam TV
महाराष्ट्र

Praniti Shinde Vs Rohit Pawar: कोण रोहित पवार? काहींमध्ये पोरकटपणा असतो, प्रणिती शिंदेंचं सणसणीत उत्तर

सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु झाल्याचं चित्र आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा, अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. रोहित पवारांच्या या मागणीला काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कडक शब्दांत उत्तर दिलं आहे.

रोहित पवारांची आमदारकीची पहिली टर्म आहे, काहींमध्ये पोरकटपणा असतो, अशी टोकदार टीका प्रणिती शिंदेंनी केली. त्यामुळे सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु झाल्याचं चित्र आहे.

प्रणिती शिंदेंनी काय म्हटलं?

सोलापूर लोकसभेसंदर्भात रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता, प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की, कोण रोहित पवार? म्हणत त्यांच्या वक्तव्याला किंमत न देण्याचा प्रयत्न केला. आमदारकीची त्यांची ही पहिलीच टर्म आहे. काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.

रोहित पवार यांनी काय म्हटलं होतं?

काही दिवसांपूर्वी रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस लढविणार की राष्ट्रवादी, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत लवकरच महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा होणारा पराभव पाहून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

SCROLL FOR NEXT