Nana Patole  Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यानं धुतले नाना पटोले यांचे चिखलानं माखलेले पाय, पाहा व्हिडिओ

Nana Patole News: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्यानं धुतले.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय गवळी, साम टीव्ही, अकोला प्रतिनिधी

अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यात एका कार्यकर्त्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतले आहेत. कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याच्या कृतीमूळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अकोला जिल्ह्यातील वाडेगाव इथं एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांचे पाय चिखलानं माखले. एका कार्यकर्त्यानं त्यांचे पाय धुतले.

मिळाली माहितीनुसार, नाना पटोले आज अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलंय. यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलातून मार्ग काढत त्यावेळी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. मात्र दर्शनानंतर आपल्या गाडी जवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्यानं धुतलेय.

विजय गुरव, असा या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे आकृतीमूळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर; म्हणाला, अमेरिकेत असताना ती एक गोष्ट मनाला खूप लागली

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT