Rahul Gandhi Pandharpur wari saam
महाराष्ट्र

Pandharpur Wari: राहुल गांधी वारीला येणार; शरद पवारांचं राहुल गांधींना वारीचं निमंत्रण

Rahul Gandhi Pandharpur wari: शरद पवारांनी निमंत्रण दिल्यानंतर राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहे. मात्र राहुल गांधींच्या वारीवरून राजकारण तापलंय. पवारांनी दिलेल्या निमंत्रणावर भाजपनं आक्षेप घेतलाय. त्यामुळे राहुल गांधीत वारीत सहभागी होतील तेव्हा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो. यावरचा हा रिपोर्ट

Vinod Patil

राज्यात सर्वदूर टाळ-मृदुंगाचा गरज सुरू असून सगळीकडे वारीचं वातावरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वारीत लाखो वारकरी सहभागी झाले असून पंढरीच्या दिशेनं त्यांच्या पावलं पडत आहेत. या वारीत दरवर्षी अनेक दिग्गज नेते अभिनेतेही सहभागी होतात. यंदा विरोधी पक्षनेते राहुल गांधीही 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी त्यांना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. हे निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलंय. वाखरीत राहुल गांधी वारीत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसनं दिलीय.

पवारांनी राहुल गांधींना दिलेल्या निमंत्रणावरून आता राजकारण सुरू झालंय. भाजपनं या निमंत्रणावरून टीका केलीय. तर या टीकेला पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

राहुल गांधी आणि शरद पवार यांना आजपर्यंत वारकरी आणि वारी दिसले नाहीत. आज त्या वारीत तुम्ही येत आहात. शरद पवार यांचे पाय हे गेल्या ८४ वर्षात वारी आणि पंढरपरकडे ते कोणत्या तोंडाने राहुल गांधींना वारी सहभागी होण्याचं निमंत्रण देता, अशी घणाघाती टीका भाजपचे अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष तुषार भोसले म्हणालेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींचा टेंपल रन लक्षवेधी ठरला होता. आता पहिल्यांदाच राहुल गांधी वारीला येत आहेत. यंदा वारीनंतर लगेचच विधानसभा निवडणुका येत असल्यामुळे मविआनं राहुल गांधींच्या वारीचं टायमिंग साधल्याची चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solkadhi Benefits: उन्हाळ्यात थंडगार सोलकढी पिण्याचे हे आहेत 5 आश्चर्यकारक फायदे

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, वाचा आजचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: IT कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरण; अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Horoscope: पुढील १५ दिवसात नशीब पालटणार! जीवनात असतील रिस्क आणि ट्विस्ट, कोणत्या राशी ठरतील भाग्यवान अन् कोणाला होईल नुकसान?

LPG Cylinde: मोठी बातमी! गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा मोठा बदल, सर्वसामान्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT