Amit Jhanak Saam TV
महाराष्ट्र

मलिकांच्या अटके विरोधात आंदोलनाला गेलेल्या काँग्रेस आमदाराच्या गाडीचा अपघात

नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेचा निषेधार्थ राज्यभरात तीव्र आंदोलन, निदर्शनं करण्यात येत आहेत.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने केलेल्या अटकेचा निषेधार्थ राज्यभरात तीव्र आंदोलन, निदर्शनं करण्यात येत आहेत.

दरम्यान आज नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याकरिता रिसोड मतदार संघाचे काँग्रेस आमदार अमित झनक (Congress MLA Amit Jhanak) हे वाशिम येथील आंदोलन आटोपून परत जात असताना, अकोला - नांदेड महामार्गावर सावरगाव गावानजीक जवळ आमदार अमित झनक यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे.

मात्र, या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून, आमदार ही सुखरूप आहेत. मात्र यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT