Praniti Shinde, PM Modi saam tv
महाराष्ट्र

Praniti Shinde News: 'महिलांकडे तुच्छ नजरेने बघणारे सरकार'; काँग्रेस महिला आमदार माेंदीबद्दल म्हणाल्या...

Anganwadi Sevika Andolan: अंगणवाडी सेविकांच्या आंदाेलनास आमदार प्रणिती शिंदेंनी दिली भेट.

विश्वभूषण लिमये

Solapur News : केंद्र सरकार (central government) हे गोरगरिबांचे सरकार नाहीये. महिलांचे तर नाहीच नाही. महिलांकडे (women) तुच्छ नजरेने सरकार बघते अशी टीका काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी साेलापूरात (solapur) केंद्र सरकावर केली. सोलापुरातील अंगणवाडी सेविकेंच्या आंदोलनास (anganwadi sevika andolan) आमदार शिंदे यांनी भेट देत त्यांच्या समस्या जाणल्या. त्यावेळी आमदार शिंदे बाेलत हाेत्या.

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या महिलांवर अन्याय करणारे हे सरकार आहे. महिलांना न्याय मिळवून देणारे तर दूरच राहिले. इंदिरा गांधींची काँग्रेस, सोनिया गांधींजी काँग्रेस सदैव तुमच्या सोबत आहे. तुमचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

आमदार शिंदे म्हणाल्या माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी हे जेव्हा चालतात त्यावेळेस सर्व महिला त्यांना मिठ्या मारतात, त्यांच्या जवळ जातात. त्या महिला त्यांच्याकडे भाऊ म्हणून बघतात. आमचे नेते राजीव गांधी यांचा जीव त्यामुळे गेला असेही त्यांनी नमूद केले. (Maharashtra News)

आमदार शिंदे म्हणाल्या एक महिलेने राजीव गांधी यांना भावा समान मिठी मारली आणि त्यात त्यांचा जीव गेला. राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेत चालत होते. वयस्कर महिला तरुण महिला या राहुल गांधी यांच्या जवळ येऊन त्यांना मिठ्या मारत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जातील तेव्हा त्यांना मिठी मारण्याची हिम्मत होईल का ? असा प्रश्न आमदार शिंदेनी महिलांना केला. लगेच त्याच्याबद्दल बोलले जाते हाच फरक आहे काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांंच्या रांगा

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

Cancer Care: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! नव्या कॅन्सर सेंटरचे लोकार्पण; उपचारासाठी आता दूर जाण्याची गरज नाही

तुमची सबसिडी जाणार, सिलेंडर महागणार? सरकार सबसिडी बंद करण्याच्या तयारीत?

SCROLL FOR NEXT