जालन्यात भाजपच्या जण आशीर्वाद यात्रेला काँग्रेस आमदाराची हजेरी Saam Tv
महाराष्ट्र

जालन्यात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला काँग्रेस आमदाराची हजेरी

केंद्रात वर्णी लागल्या नंतर राज्यात भाजपच्या (BJP) वतीने जण आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना: केंद्रात वर्णी लागल्या नंतर राज्यात भाजपच्या (BJP) वतीने जण आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. भाजपच्या या जण आशीर्वाद यात्रेला मनसे आमदार राजीव पाटील यांनी हजेरी लावून यात्रेतील मंत्र्यांचे स्वागत केल्याच्या बातम्या ताजा असतांना आज जालन्यात शासकीय विश्रामगृह केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्या पत्रकार परिषद सुरू असताना जालना विधान सभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी या वेळी उपस्थिती लावून केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या भेटीने चर्चाना उधाण आलं आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद गेल्या लोकसभा निवडणुकी पासून सुरू आहे. दिघात कुरघोडीचे राजकारण सर्व श्रुत असताना.आज या भेटी मुळे माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांना पराभूत करण्यासाठी दानवे यांनी काँग्रेस आमदार कैलाश गोरंट्याल यांना मदत केल्या चा आरोप केला जातो.

त्यांतच जण आशीर्वाद यात्रे दरम्यान आमदार कैलाश गोरंट्याल यांनी स्वागत केल्याने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात दानवे- खोतकर- गोरंट्याल अशा चर्चाना उधाण आल्याने एकच खबळ उडालीय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता.भाजपा,काँग्रेस,राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अस चित्र ही नेटकऱ्यानी रंगावयाला सुरवात केलीय.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2025: बिहारनंतर भाजपचं मुंबई निवडणुकीसाठी 'MY' रणनीती, काय आहे नेमका प्लान?

Maharashtra Live News Update: बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार

Maharashtra Politics: नागपुरमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसला जोरदार धक्का; डझनभर नेत्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Nashik Tourism : ट्रेकर्सनी आवर्जून भेट द्यावा असा नाशिकमधील ट्रेकिंग पॉइंट, हिवाळी ट्रिपसाठी परफेक्ट

Renuka Shahane : 'तेव्हा आईची खरी किंमत कळते...', रेणुका शहाणेंनी सांगितले आईचं महत्त्व, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT