congress leader rajkishor modi enters in ncp 
महाराष्ट्र

मोदींच्या निर्णयाचा राष्ट्रवादी काॅंग्रेसला होणार मोठा फायदा

विनोद जिरे

बीड : गेल्या अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत कुरघोड्याने नाराज असणाऱ्या काँग्रेसच्या राजकिशाेर उर्फ पापा मोदी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. congress-leader-rajkishore-modi-enters-ncp-in-mumbai-beed-political-news-sml80

गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यात काँग्रेस congress पक्ष टिकवून ठेवण्यात माेदींचा rajkishore modi सिंहाचा वाटा राहिला आहे. अंबाजोगाई पालिकेवर २० वर्ष काँग्रेसची सत्ता त्यांनी राखली. परंतु पक्षांतर्गत कुरघाेड्यामुळे त्यांनी आज समर्थकांसह राष्ट्रवादीची nationalist congress party वाट धरली.

गेल्या अनेक वर्षांपासून पापा मोदी हे काँग्रेस पक्षात होते. पालिका आणि पंचायतीवर अन्य पक्ष्यांची सत्ता असताना त्यांनी अंबाजोगाई पालिका आपल्या ताब्यात ठेवली. यामुळे त्यांना काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देखील देण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदावर काही काळ झाल्यानंतर त्यांचा या पदावरून पायउतार केला. त्यांच्या जागी काँग्रेसच्या राजेसाहेब देशमुख यांना ही जबाबदारी मिळाली. यामुळे पापा मोदी हे नाराज झाले. ही खदखद गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली होती. त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षासह काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार रजनीताई पाटील अपयशी ठरल्याची चर्चा आहे.

अखेर बीड जिल्ह्यात कॉंग्रेसचा गड राखून ठेवणाऱ्या पापा मोदींनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत राष्ट्रवादीत congress leader rajkishor modi enters in ncp जाहीर प्रवेश केला. दरम्यान राष्ट्रवादीच्या हातून भाजपने काबीज केलेल्या केज विधानसभा मतदार संघावर भाजपची दाेन टर्मपासून सत्ता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केज विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी पापा मोदींचा मोठा फायदा राष्ट्रवादीला होईल असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

SCROLL FOR NEXT