महाराष्ट्र

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींकडून मोठी चूक; छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजलीऐवजी वाहिली श्रद्धांजली

Rahul Gandhi Tweet On Chhatrapati Shivaji Mahajraj: राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे.

Bharat Jadhav

काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी नवीनच वादात अडकले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहताना त्यांच्याकडून चूक झालीय. छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहतांना त्यांनी श्रद्धांजली वाहलीय. राहुल गांधींनी ट्विट केलं होत त्यात त्यांनीही चूक केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिलीय. त्यामुळे भाजप आक्रमक झालाय. राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजपने जोरदार टीका केलीय. या प्रकरणी भाजपने राहुल गांधी यांना माफी मागण्याची मागणी केली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला दिलाय.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी राहुल गांधींनी श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केलंय. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलीय. जयंतीच्या दिवशी आदरांजली देतात. परंतु राहुल गांधींनी श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधींनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले, असे भाजपने म्हटलंय.

दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान वेळोवेळी केली आहेत. त्यावरुन महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असतो. या प्रकरणी पुणे जिल्हा न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरोधात खटलाही सुरू आहे. आता त्यातच शिव जयंतीला शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT