Nashik Graduate Constituency Election, Satyajeet Tambe, Solapur  saam tv
महाराष्ट्र

Nashik Graduate Constituency Election : सत्यजित तांबेंचे निलंबन जिव्हारी; काॅंग्रेस पदाधिका-याचा राजीनामा

राज्यातील विविध भागातील काॅंग्रेस पदाधिकार्‍यांकडून राजीनामा देण्याचा धडाका सुरु आहे.

विश्वभूषण लिमये

Congress : कॉग्रेसचे निलंबित नेते सत्यजीत तांबे (satyajeet tambe) यांच्या समर्थनार्थ सोलापुरात त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य उपाध्यक्ष नितीन शिवशरण (Nitin Shivsharan) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देत तांबे यांच्या पाठिशी राहणार असल्याचे म्हटलं आहे. (Maharashtra News)

नाशिक (nashik) पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency Election) बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने सत्यजित तांबेना पक्षाने सहा पक्षातून नुकतेच निलंबित केले आहे. तांबे यांचे पक्षातून निलंबन झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ राज्यातील विविध भागातून पदाधिकार्‍यांकडून राजीनामा देण्यात येत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील तांबे समर्थक नितीन शिवशरण यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा प्रदेश कमिटीकडे पाठवला आहे. युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सत्यजीत तांबे यांच्यासारखा युवक नेता हा महाराष्ट्राच्या (maharashtra) सभागृहात असणे गरजेचे आहे. तांबे यांचे काम करण्याची पध्दत, सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याची त्यांची भूमिका ही युवा नेतृत्वासाठी आवश्यक आहे. त्यामुळे तांबे यांच्या समर्थनार्थ मी राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया शिवशरण यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT