Uddhav Thackeray and Nana Patole  Saam TV
महाराष्ट्र

Breaking : महाविकास आघाडीत बिघाडी ? काँग्रेसचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा

...अन्यथा प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग राज्यभर आंदोलन करेल - नाना पटोले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक

मुंबई : ओबीसी समाजाच्या आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. मविआ सरकारचा घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना इशारा दिला आहे. ओबीसींच्या प्रश्न सोडवा. काँग्रेसच्या ओबीसी विभागाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका. ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अन्यथा प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग (obc) राज्यभर आंदोलन करेल, अशा आशयाचं पत्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. राज्यात सत्तेत असूनही काँग्रेसने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओबीसी समाजाच्या समस्यांवरुन कॉंग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी विभागाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पत्रातद्वारे दिले आहे. ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. ओबीसी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे. ओबीसींना न्याय दिला नाही, तर प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग (obc) राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणीची उद्या मुंबईत बैठक होणार आहे. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,आमदारांचे निधीचे प्रश्न, महामंडळ नियुक्त्या विविध प्रश्नांवर खलबतं होणार आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT