nana patole, balasaheb thorat, nashik saam tv
महाराष्ट्र

Nana Patole : काॅंग्रेस मित्रांना दगा देत नाही; भाजपसह नाना पटाेलेंचा मित्र पक्षास टाेला

आमच्या खूप कमी जागा आहे असा विषय नाही. सगळ्यांच्या बरोबर जागा आहेत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला अन्यथा त्यांचेही दहा होते असं नाना पटाेलेंनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nana Patole : आमच्या मित्रांनी प्रामाणिक रहावे आणि विचार विनिमय करावा हीच आमची विनंती आहे. खालच्या सभागृहात अजित दादा आहेत तर वरच्या सभागृहात नीलम ताईे. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळावे अशी आमची इच्छा होती व आहे असे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले (Nana Patole) यांनी नमूद येथे (nashik) केले.

नाना पटोले नाशिक येथे आले हाेते. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीत निर्माण झाली. महाराष्ट्राच्या हितासाठी सोनिया गांधी यांनी मविआच्या निर्णयास संमती दिली. महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीस आमच्या पक्षाचे नेेते अशाेक चव्हाण गेले हाेते. मी आणि बाळासाहेब थोरात आम्ही दोघे पद यात्रेत आहोत. खरंतर 16 तारखेला मीटिंग हाेईल अशी अपेक्षा हाेती. त्यांना (मित्र पक्ष) फॉरमॅलिटी पाळायची नसेल तर ठीक आहे कोणावर जबरदस्ती नाही असंही पटाेलेंनी स्पष्ट केलं.

आम्ही मित्र घेऊन चालणारी लाेक आहाेत. मित्रांना दगा देणारे नाही. आमचं जाेडाेचं काम आहे. आमचे विराेधक भाजप ताेडाेचं काम करीत आहे असंही पटाेलेंनी नमूद केले. ते म्हणाले भारतीय जनता पक्षापासून बिहारमध्ये नितीशकुमार बाजूला झाले. भाजप पक्षापासून लाेक दूर हाेत चालले आहेत. काॅंग्रेस समवेत जाेडलेली लाेक आजही पक्षा समवेत आहेत. काँग्रेस हा जनतेतला पक्ष आहे, निश्चितपणे काँग्रेस सोबत जनता आहे असंही पटाेलेंनी नमूद केले.

पटाेले म्हणाले सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वारकरी लोकं खोटी बोलत नाही. आपण भाजपच्या विरोधात बोलल तर कारवाई होते. पाठीशी राहिलो तर स्वच्छ होतो असं आता सामान्य माणूस देखील बोलत आहे. त्यामुळं भाजपचं वॉशिंग मशिन सारख झालं आहे. त्याची त्यांना लाज देखील राहिली नाही.

भाजपने राजकीय व्यवस्थेमध्ये नंगा नाच सुरू केला आहे अशी गंभीर टीका पटाेलेंनी केली. ते म्हणाले इंग्रज जसं करत होते, तेच सध्या चालू आहे. लाेकमान्य टिळकांनी देखील सरकारचं डाेकं ठिकाणावर आहे का असं म्हटलं हाेते तर त्यांना जेलमध्ये टाकलं हाेते. भाजपा विराेधात तुम्ही बाेलला तर आज तसंच घडतं असे पटाेलेंनी स्पष्ट केले.

सर्वाेच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतच्या घडमाेडी सुरु आहेत. आता 22 तारीख पडली आहे. डीले जस्टीस ही वाईट प्रक्रिया असल्याची खंत पटाेलेंनी व्यक्त केली. ते म्हणाले तारीख पे तारीख हे देशाच्या संविधानाला आधारित नाही. दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिलं गेलं नाही याविषयी पटाेले म्हणाले भाजपचे मूळ हे महिला नाही. त्यामुळे महिला त्यात कुठे येणार असा टाेला त्यांनी भाजपाला मारला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ear health awareness: सततचा गोंगाट ठरतोय धोकादायक! शहरातील आवाजामुळे कमी होतेय ऐकण्याची क्षमता

Maharashtra Live News Update : पालीच्या बल्लाळेश्वर देवस्थानावर महाप्रसाद बंद करण्याची वेळ

बाईक रात्रभर सुरू ठेवली, घरात विष तयार झाले, ४ जणांचा गुदमरून मृत्यू, धक्कादायक घटनेनं राज्य हादरलं

Blood Pressure Control: BP नियंत्रणात ठेवायचाय? हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? 'ही' ४ फळं खायला करा सुरू, डॉक्टरांनी दिली महत्त्वाचा सल्ला

Sunscreen Using Tips: सनस्क्रिन रोज लावयची की नाही? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT