Ashok Chavan  Saam Tv
महाराष्ट्र

MVAच्या महामोर्चाला अशोक चव्हाण गैरहजर राहणार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; ट्वीट करत चव्हाण म्हणाले...

अशोक चव्हाणांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

नांदेड : महाविकास आघाडीचा महामोर्चा  (Mahavikas Aghadi) उद्या मुंबईत काढण्यात येणार आहे. महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून हा मोर्चा काढून भाजप आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे. मात्र उद्याच्या मोर्चाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण गैरहजर राहणार आहेत. मात्र यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाण दांडी मारणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे अशोक चव्हाण पक्षातच नाराज असल्याचे मागील काही दिवसांपासून बोललं जात होतं.काही महिन्यांपासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. आता पुन्हा अशोक चव्हाणांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहे. (Latest Marathi News)

अशोक चव्हाण यांचं ट्वीट

अशोक चव्हाण उद्या नांदेडमध्ये खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील.कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी, असं अशोक चव्हाण यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अशोक चव्हाण भाजपमध्ये जणार अशा चर्चांना पुन्हा उधाण आले होते. त्यावर आता ट्विट करत विषयावर पडदा त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT