Jaiprakash Chhajed Passes Away  SAAM TV
महाराष्ट्र

Jaiprakash Chhajed Passed Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

Jaiprakash Chhajed Passed Away At Nashik : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं निधन झालं.

अभिजीत सोनावणे

Jaiprakash Chhajed Passed Away At Nashik : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंटकचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचं निधन झालं. नाशिक येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

इंटकचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच, मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस भवनमध्ये ठेवण्यात येणार आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले जयप्रकाश छाजेड हे कामगार चळवळीत सक्रिय होते. इंटकचे ते प्रदेशाध्यक्ष होते. काँग्रेस पक्षात त्यांनी शहर आणि राज्य पातळीवर अनेक संघटनात्मक पदे भूषवली होती. नाशिकच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतील प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख होती.

जयप्रकाश छाजेड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. दरम्यान, नाशिक येथील काँग्रेस भवनात बुधवारी छाजेड यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

SCROLL FOR NEXT