Buldhana News Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस आक्रमक, बुलढाण्यात निषेध आंदोलन करत केली अटकेची मागणी

महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडेला अटक करण्याची काँग्रेसची मागणी

संजय जाधव

Sambhaji Bhide News: संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत निंदाजनक असे वक्तव्य केले आहे. त्यामुळेसंभाजी भिडे यांना अटक करा, अशी मागणी करीत काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर उतरल्याचे पाहावयास मिळत आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन पार पडले. (Latest Marathi News)

महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडे विरोधात आज काँग्रेसने बुलढाणा जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात केली आहे. सातत्याने महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या संभाजी भिडे यांना सरकार वाचवत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

महात्मा गांधी यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवत महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसकडून आता केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात ठीक ठिकाणी काँग्रेसकडून संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे.

सरकारने तात्काळ महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या, महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई करून तात्काळ त्यांना अटक करावी अशी मागणी काँग्रेस करताना पाहायला मिळत आहे. शेगावात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन पार पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Gogawale emotional reaction: महाराष्ट्राने निर्भीड व्यक्तीमत्त्व गमावलं, दादांच्या निधनाने मंत्री भरत गोगावले भावूक

Tirgrahi Yog: 200 वर्षांनंतर या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोगाने होणार मालामाल

Ajit Pawar death News LIVE Updates : अजित पवारांच्या निधनानंतर मुलगा पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल दिल्लीतून रवाना

Ajit Pawar Death: अजित पवारांचे विमान कसं कोसळलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितला अपघाताचा थरार; पाहा VIDEO

Ajit Pawar death: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतली अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती

SCROLL FOR NEXT