काँग्रेसतर्फे क्रांतिवीर शिरीषकुमार यांना अभिवादन  दिनू गावित
महाराष्ट्र

काँग्रेसतर्फे क्रांतिवीर शिरीषकुमार यांना अभिवादन

नंदुरबारमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे 'व्यर्थ ना हो बलिदान' या कार्यक्रमात हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारांचा सत्कार देखील सत्कार करण्यात आला.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित 'व्यर्थ न हो बलिदान' कार्यक्रमात बाल क्रांतिकारक शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या स्मारकाला अभिवादन करून स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री के सी पाडवी आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस कार्याध्यक्ष दिलीप नाईक, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वांतत्र्याच्या लढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतिकारांची नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी पूर्ण राज्यात १ ऑगस्ट पासून 'व्यर्थ न हो बलिदान' कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत आहे. स्वांतत्र्याच्या लढ्यातील योगदानावर काँग्रेस पक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेली चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. केंद्रातील भाजप सरकार स्वातंत्र्य हिरावत असल्याचा त्यांनी केला. भाजपा सरकार हे हिंदु विरोधी असुन गंगानदी मध्ये वाहुन गेलेले मृतदेह हे हिंदुचे नव्हते का असा प्रश्न त्यांनी केला.

भगवा हि कोणा एका पक्षाची जहागीर नसून, मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस असल्याची जहरी टिका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे. 'चाय में बिस्कीट नहीं, तर संपुर्ण देश बुडतो आहे' असा उपरोधात्मक टोला देखील त्यांनी लगावला. आज त्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे आयोजीत 'व्यर्थ न हो बलिदान' कार्यक्रम संप्पन झाला. नंदुरबार मध्ये झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेनमध्ये प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास वसूल करणार दंड, काय आहे नियम?

Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT