Sangli political News  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Sangli political News : काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय. काँग्रेसमधील बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.

Vishal Gangurde

सांगलीतील काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे.

सांगलीतील पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश होणार

सांगली : महाविकास आघाडीला लागलेली गळती सुरु आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. सांगलीतील काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाने विश्वजीत कदम यांना तगडा झटका बसणार आहे.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सांगलीतील निश्चित.. विश्वजीत कदम यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेसचे विधानसभा उमेदवार कॉंग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी किंवा गुरुवारी पक्ष प्रवेश होणार आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बंद खोलीत पृथ्वीराज पाटील यांच्याशी चर्चा झाली होती. पृथ्वीराज पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सांगलीतील राजकीय समीकरण बदलणार आहे.

काही दिवसांपूर्वी सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासहित भाजपचे दिग्गज नेते त्यांच्या घरी भोजनासाठी आले होते. पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या डिनर डिप्लोमेसीची जिल्ह्यात जोरदार चर्चा झाली.

यावेळी बंद खोलीत पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली. या भेटीत पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाने विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महिला नेत्या जयश्री पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांच्या रुपाने सांगलीत काँग्रेसला दुसरा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षीय मुलीचं बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

Aadhaar Address Update : आता घरबसल्या बदला आधारवरील पत्ता; नवीन Aadhaar App मुळे प्रक्रिया झाली सोपी

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT