माजलगावमध्ये संभाजी भिडेंच्या कार्यक्रमावरून गोंधळ विनोद जिरे
महाराष्ट्र

माजलगावमध्ये संभाजी भिडेंच्या कार्यक्रमावरून गोंधळ

कार्यक्रमाला परवानगी न घेतल्यानं पोलीस अधिकारी आणि आयोजकात शाब्दिक चकमक

विनोद जिरे

बीड - माजलगावमध्ये शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमावरून, माजलगावमध्ये गोंधळ उडाला आहे. शहरातील रस्त्यावर आंबेडकरवादी तरुण उतरले असून भिडेंच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आहेत.

हे देखील पहा -

तर या कार्यक्रमाला माजलगावच्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून परवानगी न घेतल्याने, पोलिस अधिकारी आणि आयोजक कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली आहे. दरम्यान परवानगी न घेतल्याने जमवलेले कार्यकर्ते तात्काळ पांगवा, अशी नोटीस पोलिसांनी आयोजकांना दिली आहे.

तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्या विरोधात आंबेडकरवादी तरुण प्रचंड घोषणाबाजी करत आहेत. यामुळे माजलगावमध्ये संभाजी भिडेंच्या येण्यापूर्वीच, वातावरण तणावपूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर कोणताही वाद होऊ नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून प्रत्येक स्थितीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं आता हा कार्यक्रम होणार का ? याकडं सर्वांचं लक्ष आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Motor Insurance Rules : १५ डिसेंबरपासून वाहनधारकांना मोठा झटका! कार-बाईक विम्याचे नियम बदलणार

Maharashtra News Live Update: कुडाळच्या स्टेट बँकेत चाकूचा धाक दाखवून घातला दरोडा

Kitchen Hacks : काळाकुट्ट तवा होईल चकाचक! मीठ, लिंबू अन् बेकिंग सोड्याची ही ट्रिक एकदा वापरून पाहाच

शिवसेना अन् धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट; सुनावणीत खळबळ

हिवाळ्यात गाजर खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT